Photo Credit; instagram

'या' झाडांनी सजवा घराची बाल्कनी! घरात सुख-समृद्धी तर येईलच, पण पैसाही..

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रात झाडांचं विशेष महत्त्व सांगण्यात आलं आहे. यामध्ये काही अशी झाडं आहेत, जी लावल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुख आणि समृद्धी नांदते.

Photo Credit; instagram

घरात झाडं लावल्यानं हिरवळ तर राहतेच, पण याशिवाय सुख, शांती आणि धनसुद्धा घरात आकर्षित होतं. वास्तुशास्त्रात चमत्कारी मानल्या जाणाऱ्या अशा 5 झाडांविषयी जाणून घ्या.

Photo Credit; instagram

तुळशीचं रोप वास्तु आणि धार्मिक अशा दोन्ही दृष्टींनी अत्यंत पवित्र मानलं जातं. हे पूर्व किंवा उत्तर-पूर्व दिशेत लावल्याने घरातील वातावरण शुद्ध राहतं आणि घरात सुख-शांती टिकून राहते.

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार, शमीचं (लाजाळू) झाड शनी दोष आणि नकारात्मक विचार दूर करण्यासाठी फायदेशीर असल्याचं मानलं जातं. शनिवारी हे झाड लावणं शुभ मानलं जातं. हे झाड जीवनातील समस्या दूर करून सुख समृद्धी आणण्यासाठी उपयुक्त ठरतं.

Photo Credit; instagram

वातावरणातील दूषित घटक दूर करण्यासाठी स्नेक प्लांट फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. हे झाड घरातील पूर्व किंवा दक्षिण पूर्व दिशेत लावल्याने सकारात्मक वातावरण राहतं.

Photo Credit; instagram

बांबूचं झाड हे फेंगशुई आणि वास्तुशास्त्रानुसार सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. हे झाड घरातील उत्तर किंवा पूर्व दिशेत लावल्याने जीवनात धन, यश आणि संतुलन टिकून राहतं.

Photo Credit; instagram

मनी प्लांट हे घरात आर्थिक समृद्धी आणणारं मानलं जातं. हे झाट घरात दक्षिण-पूर्व दिशेत लावल्याने पैशांचा प्रवाह टिकून राहतो आणि आर्थिक समस्या दूर होतात. हे रोप नात्यांमधील सामंजस्य टिकवून ठेवण्यास मदतशीर ठरतं.

पुढील वेब स्टोरी

कंबरेचा घेर अन् पोटाची चरबी झपाझप वितळेल, आहारात फक्त 'या' बियांचा समावेश करा

इथे क्लिक करा