'या' दिवाळीमध्ये असणार 'हे' शुभ योग, लक्ष्मी पूजनाची 'ही' वेळ ठेवा लक्षात
तेजोमय दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी, यावेळी ही दिवाळी 12 नोव्हेंबर रोजी होत आहे.
दिवाळीमध्ये लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केल्याने घरात ऐश्वर्य आणि समृद्धी येते असं समजले जाते.
दिवाळी दिवशी भगवान श्री राम 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले होते, त्यादिवशी त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी दिवे लावले होते. त्या वेळेपासून दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते.
हिंदू परंपरेनुसार दिवाळी हा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावास्येला साजरा केला जातो.
कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथी रविवार, 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:44 वाजता सुरू होणार आहे. तर सोमवार, 13 नोव्हेंबर रोजी ही अमावस्या दुपारी 2:56 वाजता समाप्त होणार आहे. उदयतिथीनुसार यावेळी 12 नोव्हेंबरलाच दिवाळी साजरी होणार आहे.
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाची वेळ संध्याकाळी 5:39 ते 7:35 पर्यंत असणार आहे.
तसेच, दिवाळीची पूजा प्रदोष कालात होते, म्हणून या दिवशी प्रदोष कालाची वेळ संध्याकाळी 5:39 ते 8:08 पर्यंत असणार आहे. या दिवशी वृषभ काळ संध्याकाळी 5:39 ते 7:35 पर्यंत असणार आहे.
यावेळी दिवाळीत 5 राजयोग तयार होणार आहेत. त्यामध्ये गजकेसरी, हर्ष, उभयचारी, कहल आणि दुर्धारा असा राजयोग तयार होणार आहे. जे सुमारे 500 वर्षांनंतर तयार होत आहेत.
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी पूजेची तयारीही केली जाते. त्यानंतर लक्ष्मी आणि भगवान गणेशाच्या मूर्ती पूजेसाठी तयार करुन त्यासमोर दिवा लावा आणि पूजा करा.
दिवाळीच्या रात्री लक्ष्मीला गुलाबाचे फूल आणि काही नाणी अर्पण करा. व ती नाणी दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व नाणी एखाद्या गरीबाला दान करा.