Photo Credit; instagram

अक्षय्य तृतीया आली जवळ, सोनं खरेदीचा 'हा' आहे सगळ्यात सॉलिड मुहूर्त!

Photo Credit; instagram

वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला 'अक्षय्य तृतीया' म्हणतात. या दिवशी केलेले कोणतेही कार्य शाश्वत फळ देते असे मानले जाते.

Photo Credit; instagram

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच या दिवशी सोने, चांदी किंवा नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते.

Photo Credit; instagram

हा दिवस शुभ मुहूर्त असल्याने तुम्ही कधीही कोणतीही खरेदी किंवा शुभ कार्य करू शकता, परंतु जर तुम्ही विशेष मुहूर्तावर सोने खरेदी केले तर देवी लक्ष्मी अधिक प्रसन्न होईल.

Photo Credit; instagram

या वर्षीच्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त कोणता? याविषयी जाणून घ्या.

Photo Credit; instagram

वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 29 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5:31 वाजता सुरू होईल आणि 30 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2:12 वाजता समाप्त होईल. उदिया तिथीनुसार, हा सण 30 एप्रिल रोजी साजरा केला जाईल.

Photo Credit; instagram

ज्योतिषांच्या मते, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पहाटे 5:42 ते सकाळी 9 वाजेपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे.

Photo Credit; instagram

जर तुम्हाला कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर त्यासाठी शुभ वेळ सकाळी 9:00 ते दुपारी 12:00 वाजेपर्यंत आहे. या शुभ वेळेत तुम्हील गृहप्रवेश करु शकता, नवीन व्यवसाय सुरू करू शकता किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करू शकता.

Photo Credit; instagram

ज्योतिषाच्या मते, या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 12:18 वाजेपर्यंत सोने, चांदी किंवा कोणतीही नवीन वस्तू खरेदी करता येते.

Photo Credit; instagram

शास्त्रांनुसार, या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करणाऱ्यांच्या घरात सुख-समृद्धी वाढते.

पुढील वेब स्टोरी

उपजिल्हाधिकारी ओशिन शर्माचे 10 फोटो, पाहून तुम्हीही म्हणाल विषय लय हार्डए...

इथे क्लिक करा