Photo Credit; instagram

श्रावणात महिलांनी फक्त 'हे' करा... मिळतील चमत्कारी फायदे

Photo Credit; instagram

श्रावणाचा महिना भगवान शंकर आणि माता पार्वतीची भक्ती करण्यासाठी पवित्र मानला जातो. यावेळी शंकराची उपासना केल्याने जीवनात सुख, शांती, समाधान आणि वैभव प्राप्त होतं.

Photo Credit; instagram

विशेषत: सुवासिनी महिलांसाठी श्रावणाचं विशेष महत्त्व आहे. या महिन्यात काही खास उपाय केल्याने स्त्रीचं वैवाहिक आयुष्य चांगलं होतं आणि पतीला दिर्घायुष्य मिळण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

श्रावणात दररोज शिवलिंगावर जल, दूध किंवा गंगाजल अर्पण करुन अभिषेक करणं शुभ मानलं जातं. यामुळे भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो.

Photo Credit; instagram

पूजा करतेवेळी भगवान शंकराला बेलपत्र, धोत्रा आणि पांढरी फूलं अर्पण करणं शुभ मानलं जातं. या गोष्टी भगवान शंकराला प्रिय असून घरात सुख आणि समृद्धी आणण्यासाठी मदत करतात.

Photo Credit; instagram

सुवासिनी महिलांनी श्रावण महिन्यात हिरव्या रंगाची साडी आणि हिरव्या बांगड्या परिधान करायला हव्यात. हा रंग समृद्धी, सौभाग्य आणि पतीच्या दिर्घायुष्याचं प्रतीक मानलं जातं.

Photo Credit; instagram

श्रावणातील सोमवारचं व्रत केल्याने पतीची आयुष्य वाढतं तसेच वैवाहित जीवनात सुख आणि समृद्धी राहते.

Photo Credit; instagram

या पवित्र महिन्यात काजळ, सिंदूर, बांगड्या, टिकली सारख्या श्रृंगाराच्या वस्तूंचं दान केल्याने माता पार्वती प्रसन्न होते आणि स्त्रियांच्या सौभाग्यात वृद्धी होते. श्रावणात स्त्रियांनी संपूर्ण सोळा श्रृंगार केला पाहिजे, असं सांगितलं जातं.

Photo Credit; instagram

श्रावणाच्या महिन्यात भगवान शंकराची आराधना करा. तसेच मांस, मद्य आणि धूम्रपान पासून दूर राहा. यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा राहते.

Photo Credit; instagram

हा महिना पवित्र असून तो भक्ती, संयम आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो. यादरम्यान, सेवेची भावना ठेवून शुभ कार्य केल्याने चांगलं पुण्य मिळतं.

पुढील वेब स्टोरी

सावधान! स्वंपाकघरातील 'या' वस्तू... आरोग्यासाठी ठरतील घातक

इथे क्लिक करा