रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ यंदाचा हंगामात आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यासाठी पुन्हा मैदानात उतरणार आहे.
संघाला गेल्या वर्षीची कामगिरी विसरून मैदानात उतरावं लागणार आहे आणि नव्या रणनीतीने समोरच्या संघाचा सामना करावा लागणार आहे.
अशा परिस्थितीमध्ये हे खेळाडू संघासाठी योग्य सिद्ध होऊ शकतात.
रोहित शर्मा : रोहितने एकूण 227 सामने खेळले असून, त्याने 5879 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 40 अर्धशतकांचा समावेश आहे.
ईशान किशन : गत हंगामात फारशी चमकदार कामगिरी करू शकला नव्हता, मात्र यावेळी संघाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत.
सुर्यकुमार यादव : मैदानावर 360 डिग्री शॉट्स खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवची मैदानावर चमकदार कामगिरी बघायला मिळू शकते.
पियुष चावला: 34 वर्षीय स्टार गोलंदाज पियुष चावलाला लिलावात मुंबई इंडियन्सने विकत घेत संघात समाविष्ट केले.
कुमार कार्तिकेय : कुमार कार्तिकेयला गेल्या मोसमात 4 सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. पण यावेळी त्याला संघात स्थान मिळाल्यास तो संघासाठी योग्य खेळाडू सिद्ध होऊ शकतो.