शुभमन म्हणतो 'तुम्ही हार मानू नका', व्हिडीओ केला शेअर
प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट निर्माता विधू विनोद चोप्रा यांचा चित्रपट '12 वीं फेल' चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे.
'12वी फेल'मध्ये विक्रांत मॅसी मुख्य भूमिकेत आहे. त्याने आपल्या अभिनयाने चित्रपट सुंदर केला आहे. त्यामुळे त्याला प्रेक्षकांचे प्रचंड प्रतिसादही मिळत आहे.
भारतीय क्रिकेटर शुभमन गिलने या चित्रपटाबाबत एक संदेश दिला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर शुभमनने त्या चित्रपटातील एक व्हिडीओही शेअर केला आहे.
व्हिडिओ शेअर करताना त्याने भारतातील प्रेरणा देणाऱ्या गोष्टींबद्दल लिहिले आहे. तसेच स्वप्नांच्या मागे धावत असाल तर ती स्वप्नं तुम्ही कधी सोडू नका असंही त्यानं सांगितले आहे.
'12वीं फेल' हे लाखो विद्यार्थ्यांच्या संघर्षाचे प्रतिबिंब आहे. जे UPSC परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगत असतात.
UPSC परीक्षेत अपयश आलेल्या विद्यार्थ्यांसाठीही हा चित्रपट एक महत्वाचा संदेश देणारा चित्रपट आहे.
हा चित्रपट हिंदीबरोबरच तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे.
Weight loss साठी 8 हाय-प्रोटीन नाश्त्यांचे उत्तम पर्याय!