वर्ल्ड कप 2023 मध्ये आता एक वेगळाच वाद समोर आला आहे. सोमवारी (6 नोव्हेंबर) दिल्लीत श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सामना झाला त्यावेळी ही घटना घडली आहे.
या सामन्यात श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजला टाइम आऊट देण्यात आला, आणि 146 वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासात ही घटना पहिल्यांदाच घडली.
या सामन्यावेळी 25व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सदिरा बाद झाला. त्यानंतर मॅथ्यूज मैदानात आला, पण त्याचवेळी त्याचे हेल्मेट खराब झाले हे त्याच्या लक्षात आले.
मॅथ्यूजने त्यावेळी आपल्या सहकाऱ्याकडून दुसरे हेल्मेट मागितले होते, त्याचवेळी गोलंदाज शाकिब अल हसनने त्यावर लगेच अपील केले. आणि पंचांनी मॅथ्यूजला लगेच टाईम आऊट म्हटले.
टाइम आऊट दिल्यामुळे मॅथ्यूज एकही चेंडू न खेळता बाद झाला, आणि बांगलादेशला एकाच चेंडूवर दोन विकेट मिळाल्याचा आनंद झाला.
क्रिकेटच्या नियमानुसार विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज बाद झाल्यानंतर नवा फलंदाज 3 मिनिटांच्या आत नवा खेळाडू तयार असला पाहिजे.
त्यामुळे क्रिकेटच्या नियमानुसार फलंदाज तसे करु शकले नाहीत, तर नियमानुसार त्याला बाद घोषित केले जाते. त्यालाच 'टाइम आउट' असं म्हणतात.
क्रिकेटच्या 40.1.2 नुसार जर नवीन फलंदाज 3 मिनिटांच्या आता खेळपट्टीवर आला नाही, तर फलंदाजाला 16.3 च्या नियमानुसार 'टाइम आऊट' दिला जातो.
मात्र सध्या विश्वचषक 2023 मध्ये टाइमआउटचा नियम 3 मिनिटांवरून 2 मिनिटांवर आणण्यात आला आहे. तोच नियम मॅथ्यूजला लागू करण्यात आला.
विश्वचषक 2023 च्या नियम 40.1.1 नुसार - विकेट किंवा फलंदाजाच्या निवृत्तीनंतर, जर अंपायरने खेळ थांबवला नाही, तर नवीन किंवा इतर फलंदाजाने 2 मिनिटांच्या आत पुढील चेंडू खेळण्यासाठी तयार असले पाहिजे.