Arrow

काजोलचा Deepfake Video व्हायरल, कॅमेऱ्यासमोर कपडे बदलताना..

Arrow

रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक नवा वाद निर्माण झाला आहे. अभिनेत्री काजोलचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

Arrow

व्हायरल झालेला तो मूळ व्हिडीओ हा परदेशातील एका रोझी ब्रीनचा असल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल झालेली ही क्लिप त्यांनी टिकटॉकवरही पोस्ट केली आहे.

Arrow

फॅक्ट चेक प्लॅटफॉर्म BoomLive नुसार रोझीने हा व्हिडीओ 5 जून रोजी टिकटॉकवर पोस्ट केला होता असंही सांगण्यात येत आहे. 

Arrow

या फेक व्हिडिओमध्ये रोझीचा चेहरा बदलून काजोलचा चेहरा लावण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये काजोल कॅमेऱ्यासमोर कपडे बदलत आहे असं दाखवण्यात आले आहे.

Arrow

त्या व्हिडिओमध्ये छेडछाड करून रोझीचा चेहरा ए़़डिट करुन त्यामध्ये काजोल असल्याचे दाखवण्यात आले आहे. 

Arrow

अभिनेत्री रश्मिकानंतर आता काजोल डीपफेकची शिकार झाली आहे. या प्रकारामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. 

Arrow

सोशल मीडियावर या प्रकारचे व्हिडीओ तयार करण्यात येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

Arrow

काही दिवसांपूर्वी टायगर 3 मधील कतरिना कैफचा टॉवेल सीनमध्येही छेडछाड करुन तो फोटोही व्हायरल करण्यात आला होता.

Arrow

डीपफेक तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्यात येत असल्याने अशांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही युजर्सनी केली आहे. काजोलने मात्र तिच्या या फेक व्हिडिओवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 

सेमीफायनलमध्ये 7 विकेट घेणाऱ्या शमीने वजन ‘असं’ केलेलं कमी!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा