Photo Credit; instagram

Anant-Radhika चे ठरले वेडिंग डेस्टिनेशन? खर्च ऐकून बसेल धक्का

Photo Credit; instagram

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी जुलैमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे अशी चर्चा आहे. हे लग्न लंडनमध्ये होणार असल्याची बातमी आहे.

Photo Credit; instagram

गुजरातमधील जामनगरमध्ये लग्नाआधीच्या भव्य सोहळ्यानंतर अनंत-राधिका यांनी लग्नासाठी लंडन हे ठिकाण निवडले आहे.

Photo Credit; instagram

माहितीनुसार, अनंत-राधिकाचा विवाह सोहळा जुलैमध्ये लंडनमधील त्यांच्या स्टोक पार्क इस्टेटमध्ये होणार आहे.

Photo Credit; instagram

या 300 एकर मालमत्तेत हॉटेल, कंट्री क्लब आणि स्पा आहे. ही इस्टेट सन 1066 मध्ये बांधण्यात आली होती आणि 1760 मध्ये तिचा विस्तार करण्यात आला होता.

Photo Credit; instagram

या सुंदर मालमत्तेमध्ये ऐतिहासिक उद्याने, तलाव आणि स्मारके आहेत. सध्या ते 5 स्टार हॉटेल म्हणून उभारले आहे, ज्यात 49 लक्झरी खोल्या आहेत.

Photo Credit; instagram

या सर्व खोल्यांमध्ये संगमरवरी बाथरूम आहेत. यासोबतच तीन रेस्टॉरंटही आहेत. हे ठिकाण स्वर्गासारखे आहे.

Photo Credit; instagram

यात 4000 स्क्वेअर फूट जिम आणि फिटनेस सेंटर आहे. यामध्ये एक इनडोअर स्विमिंग पूल आणि 13 मल्टी-सरफेस टेनिस कोर्ट तसंच एक भव्य गोल्फ कोर्स आहे.

Photo Credit; instagram

1581 मध्ये स्टोक पार्क इस्टेट हे राणी एलिझाबेथ-I चे घर होते हे अनेकांना माहीत नाही. त्यानंतर त्याचे कंट्री क्लबमध्ये रूपांतर झाले.

Photo Credit; instagram

हा यूकेमधील सर्वात जुना कंट्री क्लब आहे. एवढंच नाही तर या मालमत्तेवर जेम्स बाँड चित्रपट- गोल्डफिंगर, टुमॉरो नेव्हर डायज चित्रित करण्यात आले होते.

पुढील वेब स्टोरी

Weight Loss साठी दररोज खा 'हे' 5 प्रोटीनयुक्त पदार्थ!

इथे क्लिक करा