लठ्ठपणा, अति मद्यपान आणि धूम्रपान यांसारख्या सवयी चुकीच्या लाईफस्टाईलचा भाग आहे. यामुळे तरुणांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो आहे.
पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढतं आहे. कारण या समस्यांकडे वेळीच लक्ष न दिल्यास ब्रेस्ट कॅन्सरने बळी पडणाऱ्या पुरुषांची संख्याही सातत्याने वाढत जाणार आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेव्हा पुरुषांच्या स्तनाच्या ऊतीमध्ये कर्करोगाच्या पेशी तयार होतात तेव्हा ब्रेस्ट कॅन्सरची होण्याची शक्यता असते.
सुमारे 10 वर्षांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सरची समस्या फक्त 50-70 वयोगटातील लोकांमध्ये दिसून येत होती, परंतु आता 40-50 वर्षे वयोगटातील लोकही त्याला बळी पडू लागले आहेत.
मात्र, महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण खूपच कमी आहे.
पुरुषांच्याब्रेस्ट कॅन्सरमध्ये लोक अनेकदा व्रण यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात.
या लक्षणांमुळे पाठदुखी, कावीळ आणि श्वासोच्छवासाचाही त्रास होतो.
पुरुषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर अनुवांशिक कारणांमुळेही होऊ शकतो. याशिवाय गायकोमास्टियाने ग्रस्त असलेल्यांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.