IAS Anju Sharma : 10वी आणि 12वीमध्ये नापास मग, पहिल्याच प्रयत्नात कशी केली UPSC पास?
Photo Credit; instagram
IAS अंजू शर्मा 10वीच्या प्री-बोर्डमध्ये आणि बारावीत अर्थशास्त्र विषयात नापास झाल्या होत्या. पण इतर विषयात त्या अव्वल होत्या.
Photo Credit; instagram
अंजू शर्मा यांना कठीण काळात त्यांच्या आईने प्रोत्साहन दिलं.
Photo Credit; instagram
अभ्यासासाठी शेवटच्या क्षणावर अवलंबून राहू नये, असा धडाही आईने त्यावेळी शिकवला असं अंजू सांगतात.
Photo Credit; instagram
अंजू सांगतात की, 'प्री-बोर्ड परीक्षेत माझा खूप धड्यांचा अभ्यास बाकी होता आणि मी शेवटच्या क्षणी तयारी केली. माझी तयारी नीट न झाल्यामुळे मी अस्वस्थ झाले.'
Photo Credit; instagram
'लोक तुम्हाला तुमच्या यशासाठी लक्षात ठेवतात, तुमच्या अपयशासाठी नाही. या घटनेने माझे भविष्य घडवले.' असं त्या म्हणतात.
Photo Credit; instagram
यानंतर, कॉलेजमध्ये त्यांनी परीक्षेची आधीच तयारी केली आणि सुवर्णपदकही मिळवले. त्यांनी B.Sc पूर्ण करून आणि जयपूरमधून एमबीएही केलं.
Photo Credit; instagram
अशीच रणनीती आखून अंजूने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी आधीच अभ्यासक्रम पूर्ण केला होता आणि अशा प्रकारे त्या आयएएस टॉपर्सच्या यादीत आल्या.
Photo Credit; instagram
अंजू शर्मा गुजरात केडरच्या 1991 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्यांनी राजकोट येथून सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली.
Photo Credit; instagram
सध्या त्या शिक्षण विभागात प्रधान सचिव आहेत. त्या गांधीनगरच्या जिल्हाधिकारीही होत्या.
पाचवेळा अपयश पण मानली नाही हार,'या' IAS अधिकारीने असा केला यशाचा पल्ला पार!