Arrow

मुलांना दुधासोबत बिस्किटे खाऊ घालत असाल तर सावधान!

Arrow

अनेकदा अनेक वडिलधारी माणसं आपल्या लहान मुलांना दूध आणि बिस्किटे खायला देतात.  मुलांनाही ते खूप आवडीने खायला आवडत असते.

Arrow

दुधासोबत बिस्किटे खाऊ देत असला तर मात्र आधी काही गोष्टी तुम्हाला माहिती असणे महत्वाचे आहे. कारण त्याचा मुलांना फायदा नाही तर तोटा होत असतो.

Arrow

तज्ज्ञांच्या मते, दूध आणि बिस्किटे एकत्र खाल्ल्याने शरीराला पोषक तत्त्वे मिळत नाहीत.

Arrow

दूध आणि बिस्किटे एकत्र खाल्ल्याने शरीरात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण वाढते, ज्याचा शरीरावर खूप वाईट परिणाम होतो.

Arrow

बिस्किटे बनवण्यासाठी मैदा, साखर आणि कृत्रिम स्वीटनरचा वापर केला जातो, त्यामुळे त्यामध्ये फारच कमी फायबर असते.

Arrow

बिस्किटांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असल्याने मुलांना ते खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा भूक लागत असते.

Arrow

अनेक वेळा बिस्किट बनवताना काही गोष्टींचा वापर केला जातो ज्यामुळे मुलांना अॅलर्जीही होऊ शकते.

Arrow

ही सर्वसाधारण माहिती असून कोणत्याही समस्या असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

हिवाळ्यात अद्रक खाणं कधीच चुकवू नका

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा