Photo Credit; instagram

मांजर आडवं गेल्यावर अपशकुन होतो? खरं-खोटं काय?

Photo Credit; instagram

प्रेमानंद महाराजांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. अनेकजण त्यांच्या आयुष्यातील प्रश्न सोडवण्यासाठी वृंदावनला जाऊन प्रेमानंद महाराजांची भेट घेतात.

Photo Credit; instagram

काही दिवसांपूर्वी प्रेमानंद महाराजांना एका व्यक्तीने विचारले होते की, 'कधी कधी अंधश्रद्धेची भीती वाटते. एखादं मांजर जरी आडवं गेलं तर अपशकुन होईल का असा प्रश्न पडतो.'

Photo Credit; instagram

यावर प्रेमानंद महाराज म्हणाले, 'अनेक लोक म्हणतात की एखाद्याला शिंक आली तर तो अशुभ आहे. जर मांजरीने रस्ता ओलांडला तर अपशकून होतो.'

Photo Credit; instagram

'पण, मी म्हणतो जगातील सर्व अपशकुन एकत्र येऊदेत तुम्ही राधा राधा राधा म्हणा... आता कोणती अडचण आली तर सांगा.'

Photo Credit; instagram

'अरे हे ग्रह-नक्षत्र, या शुभ-अशुभ गोष्टी, हे विविध प्रकारचे अडथळे तेव्हाच निर्माण होतात जेव्हा तुम्ही देवापासून दूर जाता.' 

Photo Credit; instagram

'जेव्हा एक काळी मांजर तुमचा रस्ता ओलांडलते, तेव्हा तुमचं हृदय धडधडू लागतं. पण जर ती काळी मांजर श्याम श्याम म्हणून नमस्कार करून तुम्ही तिथून निघाला तर मग एक मांजर काय कितीही मांजर आल्या तरी तुम्हाला फरक पडणार नाही.'

Photo Credit; instagram

'सर्वात मोठे विघ्न म्हणजे तुमचे मन घाबरते. इथेच तुमचा पराभव होतो. जिथे तुम्हाला काही अडचण आली आहे असे वाटते तिथे जय-जय श्री राधे म्हणा.' 

Photo Credit; instagram

'मग बघा, कितीही अडथळे आले तरी ते तुमच्यासाठी शुभ परिणाम निर्माण करेल. कारण ते सर्व परमेश्वराचे सेवक आहेत. भगवंतापासून दूर जाऊन तुमची हानी करू शकणारा अडथळ्यांचा नाश करणारा कोणी नाही.'

Photo Credit; instagram

'शुभ-अशुभ असं काहीही नसतं... जसा तुमचा विश्वास आहे, तसंच तुम्हाला दिसतं.'

पुढील वेब स्टोरी

Horoscope: 'या' 5 राशींच्या लोकांचे येणार अच्छे दिन! मिळणार तुफान पैसा

इथे क्लिक करा