Photo Credit; instagram

क्षणिक सुखासाठी तुमचाच होईल गेम, दररोज 'एवढं' सिगारेट ओढणं म्हणजे टप्प्यात कार्यक्रम!

Photo Credit; instagram

सिगारेट ओढल्याने शरीरावर अनेक गंभीर दुष्परिणाम होतात आणि आठवड्यातून 50 सिगारेट ओढणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते.

Photo Credit; instagram

आठवड्यातून 50 किंवा त्याहून अधिक सिगारेट ओढल्याने फुफ्फुसाचे कार्य मंदावते. ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) चा धोका वाढतो.

Photo Credit; instagram

या प्रमाणात सिगारेट ओढल्याने हृदयावर जास्त दाब पडतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि रक्तदाबाची शक्यता वाढते.

Photo Credit; instagram

नियमित धूम्रपान केल्याने फुफ्फुस, तोंड, घसा आणि इतर अवयवांमध्ये कर्करोग होण्याचा धोकाही वाढतो, कारण सिगारेटमध्ये असलेले कार्सिनोजेन्स शरीराला हानी पोहोचवतात.

Photo Credit; instagram

सिगारेट ओढल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होते, ज्यामुळे शरीर संक्रमण आणि रोगांशी लढण्यास असमर्थ बनते.

Photo Credit; instagram

धूम्रपानामुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो आणि अल्झायमर, स्मृतिभ्रंश यांसारख्या आजारांचा सामना करावा लागतो. 

Photo Credit; instagram

सिगारेट ओढल्याने त्वचेवर सुरकुत्या पडतात आणि अकाली वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात. तसेच त्वचेची चमक कमी होते.

Photo Credit; instagram

सिगारेट ओढल्याने पोटात अल्सर आणि ॲसिडिटीची समस्या वाढू शकतात, ज्याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो.

Photo Credit; instagram

त्यामुळे सर्वांनी सिगारेट ओढणे टाळावे.

पुढील वेब स्टोरी

Radix Number : 'या' मूलांकाच्या लोकांना प्रेमात मिळतो गुलीगत धोका! 

इथे क्लिक करा