नसरुल्लासोबत लग्न करायला नाही तर... पाकिस्तानात पोहोचल्यावर अंजू काय म्हणाली?
Photo Credit; instagram
पाकिस्तानातून नोएडा येथे आलेल्या सीमा हैदर प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. अशा स्थितीत आता राजस्थानच्या भिवडी येथील अंजूचे प्रकरण समोर आले आहे.
Photo Credit; instagram
दोन मुलांची आई अंजू पतीला चार दिवस फिरायला जाते असं सांगून चक्क पाकिस्तानात गेली. ती तिच्या फेसबुक मित्र नसरुल्लाला भेटण्यासाठी गेली आहे असं तिचं म्हणणं आहे.
Photo Credit; instagram
मुलाखतीत अंजूने सांगितले,'ती आता पाकिस्तानातील पेशावरच्या अग डीप अप्पर भागात पूर्णपणे सुरक्षित आहे.'
Photo Credit; instagram
वाघा बॉर्डरवरून ती कायदेशीररित्या पाकिस्तानात पोहोचल्याचे तिने सांगितले. एका लग्न समारंभात सहभागी झाल्यानंतर ती भारतात परतणार आहे.
Photo Credit; instagram
पाकिस्तानी मित्राशी लग्न करणार का? या प्रश्नावर अंजू म्हणाली, 'मी येथे फिरण्याच्या उद्देशाने आली आहे. नसरुल्लाशी लग्न करण्याचा कोणताही हेतू नाही.'
Photo Credit; instagram
अंजूच्या मते, 'पती (अनुज) सोबत संबंध चांगले नाही. राहायचं म्हणून एकत्र राहतोय. भारतात परतल्यानंतर मी मुलांना घेऊन पतीपासून वेगळी राहीन.'
Photo Credit; instagram
36 वर्षीय अंजू ही मूळची यूपीची आहे. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील भिवडी येथे ती पती अरविंद कुमारसोबत राहते.
Photo Credit; instagram
अंजू आणि अरविंद यांचे २००७ साली लग्न झाले. त्यांना दोन मुलं आहेत.ती अलवारमध्ये खासगी नोकरी करते. यापूर्वी तिने गुरुग्राममध्येही काम केले.