Solapur : चुलीतील ठिणगीने संसार उद्ध्वस्त, वृद्ध पती-पत्नीची उरली राख
सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यातील गाडेगाव येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय.
एक किरकोळ बाब गाडेगाव येथे झोपड्यात राहणाऱ्या वृद्ध जोडप्याच्या जीवावर बेतली.
13 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कमल भीमराव पवार (90) यांनी चुल पेटवून पाणी तापत ठेवलं.
नंतर म्हैस सुटल्यामुळे तिला बांधण्यासाठी जवळील नातू प्रथमेश यास उठवले.
चुलीतील ठिणगी झोपडीत उडाल्याने आग लागली. दोघांनी विझवण्याचा प्रयत्न केला पण क्षणाधार्त भडका उडाला.
कमल यांचे पती भीमराव पवार (95) आत झोपलेले असल्यामुळे त्या त्यांना उठवण्यासाठी गेल्या.
आगीने उग्ररूप धारण केल्याने पती-पत्नीचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
आणखी वेबस्टोरीज वाचा
Related Stories
तब्बल 13 हजार जागांसाठी बँकेची बंपर भरती, 'एवढा' आहे पगार
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
प्रणिती शिंदेंविरोधात उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंची पत्नी काय करते?
सार्वजनिक ठिकाणी Kiss करणं गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो?