बापरे! भूताशी लग्न.. वर्षभर संसार थाटून आता हवाय घटस्फोट, नेमकं काय आहे प्रकरण?
एका महिलेने चक्क भूताशी लग्न केले. तसंच त्याच्यासोबत वर्षभर संसार थाटला आहे. आता तिला हे जीवन नरक वाटत आहे.
कारण, महिलेला आता घटस्फोट हवाय. रॉकर ब्रोकार्डे असे तिचे नाव आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चे भयानक फोटोही शेअर केले आहेत.
रॉकरने हे लग्न 2022 मध्ये हॅलोविनला केले होते. याचा व्हिडीओ तिने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. ती व्यवसायाने गायक आहे.
तिने सांगितले की, 5 महिन्यांच्या भेटीनंतरच तिने तिच्या काल्पनिक पतीशी लग्न केले. ती हनीमूनलाही गेली होती.
रॉकरने म्हणाली की, 'तिने ज्या व्यक्तीसोबत लग्न केलं तो जीवंत असताना व्हिक्टोरियन सैनिक होता.'
तिने आपल्या पतीचे नाव एडुआर्डो ठेवले आहे. लग्नानंतर ती जिथे जाते तिथे तिचा नवरा तिला फॉलो करतो.
38 वर्षीय रॉकर आता या लग्नात राहू इच्छित नाही. आता ती एका एक्सॉसिस्टची मदत घेण्याचा विचार करत आहे.
पतीने मर्यादा ओलांडल्या आहेत असे तिचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यांपासून तिच्या मनात वाईट विचार येतात.
ती म्हणते, 'त्यांनी वर्षाच्या सुरुवातीला विवाह समुपदेशकाची मदत घेण्याचा प्रयत्न केला. पण एडवर्डो ते गांभीर्याने घेत नाही. तो रडणाऱ्या मुलांच्या आवाजाने घाबरवतो.'
ती म्हणते, एडवर्डोला भेटण्यापूर्वी तिचा या गोष्टींवर विश्वास नव्हता. पण पहिल्यांदा तो तिला तिच्या बेडरूममध्ये दिसला.
यानंतर दोघांची एंगेजमेंट झाली. हॅलोविनच्या रात्री रिकाम्या चर्चमध्ये या जोडप्याने लग्न केले.
गॅस लाइटर साफ करायची वाटते भीती? सफाईच्या या आहेत सोप्या टिप्स