अभिनेत्री इलियाना डिक्रुज आई होणार आहे. मंगळवारी इलियानाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक छानसा फोटो शेअर करुन ही गुड न्यूज सर्वांना सांगितली.
मात्र इलियानाच्या प्रेग्नंसीच्या घोषणेनंतर अनेकांना धक्का बसला. तिचे लग्न न झाल्याने बाळाचे वडील कोण असा प्रश्न विचारला आहे.
मात्र इलियानापूर्वीही अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्या लग्नापूर्वी किंवा लग्न न करता आई झाल्या आहेत.
अभिनेत्री साक्षी तन्वरने अद्याप लग्न केलेलं नाही. मात्र 2018 मध्ये एका मुलीला दत्तक घेतले, तिचे नाव तिने दित्या ठेवले.
अभिनेत्री नीना गुप्ता लग्नाआधीच आई झाली होती. तिने मसाबा गुप्ताला जन्म दिला.
गॅब्रिएला डेमिट्रिएड्सही लग्नापूर्वीच अभिनेता अर्जुन रामपालच्या मुलाची आई बनली आहे. या दोघांच्या मुलाचे नाव अरिक आहे.
अभिनेत्री सुष्मिता सेनने दोन मुलींना दत्तक घेतलं आहे. मोठ्या मुलीचे नाव रिनी सेन आहे, तर लहान मुलीचे नाव अलिशा आहे.
अभिनेत्री अॅमी जॅक्सन बॉयफ्रेंड जॉर्ज पनायोटोच्या मुलाची आई झाली आहे.
अभिनेत्री कल्की कोचलिन इस्रायली शास्त्रीय पियानोवादक बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गसोबत राहत आहे. लिव्ह-इनमध्ये राहून दोघेही एका मुलाचे पालक झाले आहेत. दोघांनी अजून लग्न केलेले नाही.
40 वर्षांची प्रियंका चोप्रा चटपटीत पदार्थ खाऊनही राहते खूपच फिट