Photo Credit; instagram

Arrow

Adah Sharma सोबत असं काय घडलं? रूग्णालयात व्हावं लागलं भरती!

Photo Credit; instagram

Arrow

'द केरळ स्टोरी' चित्रपटाची अभिनेत्री अदा शर्मा हिने तिचे हेल्थ अपडेट शेअर केले. यावेळी तिला अ‍ॅलर्जी झाल्याचे तिने सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

अदा शर्मा हाइव्स नावाच्या अ‍ॅलर्जीने त्रस्त होती. यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. इतकंच नाही, तर अ‍ॅलर्जीसाठी घेतलेल्या औषधांचाही तिच्यावर उलटा परिणाम झाला. 

Photo Credit; instagram

Arrow

अदा शर्माने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले ज्यामध्ये तिच्या शरीरावर मोठे रॅशेस आणि लाल खुणा दिसतात.

Photo Credit; instagram

Arrow

हातावर मोठ्या रॅशचा फोटो शेअर करत तिने तिच्या विचारपूस करणाऱ्या हितचिंतकांचे आभार मानले.

Photo Credit; instagram

Arrow

एखाद्याला त्वचेवर रॅशेसच्या खुणा पाहण्यात अडचण येत असेल तर त्यांनी फोटो पाहू नयेत, असेही ती म्हणाली. तिला तिच्या समस्या चाहत्यांसोबत शेअर करायच्या होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

अ‍ॅलर्जीबद्दल अदा शर्माने लिहिले, 'गेल्या काही दिवसांपासून मला हाइव्सचा त्रास होत आहे. माझ्या हातावर पुरळ आल्याने मी पूर्ण बाह्यांचे कपडे घालू लागले. पण नंतर ते माझ्या चेहऱ्यावर येऊ लागले.'

Photo Credit; instagram

Arrow

अदा पुढे म्हणाली, 'यासाठी मी औषध घेतले नंतर मला कळले की मला त्या औषधांचीही अ‍ॅलर्जी आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

अदा आता इतर औषधे आणि इंजेक्शन घेत आहे. तिने तिच्या आईला वचन दिले आहे की ती तिच्या आरोग्याची चांगली काळजी घेईल.

Photo Credit; instagram

Arrow

अदा शर्माने 'कमांडो' या वेबसिरीजमध्ये काम केले आहे. तब्येत ठीक नसूनही ती प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 11 ऑगस्ट रोजी ही सीरिज प्रदर्शित होईल.

केसांवरून कळते कशी आहे तुमची Personality? कसा कळतो स्वभाव?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा