Anil Deshmukh: 21 महिन्यानंतर माजी गृहमंत्र्यांची नागपुरात येणार, कसं होणार स्वागत?

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे आज (11 फेब्रुवारी) 21 महिन्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात येत आहेत.

अनिल देशमुख हे 13 महिने 27 दिवस तुरुंगात होते.

जेलमधून सुटल्यावर म्हणजेच तब्बल पावणे दोन वर्षानंतर (21 महिने) आज ते नागपुरात येणार आहेत.

अनिल देशमुख यांची नागपूर विमानतळापासून ते घरापर्यंत रॅली काढली जाणार असून चौका-चौकात त्यांचे स्वागत होईल.

त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.  

अनिल देशमुख नागपुरात दाखल झाल्यानंतर, वेगवेगळ्या ठिकाणांसह धार्मिक स्थळांना भेट देणार आहेत. नंतर, ते त्यांच्या घरी पोहोचतील.

अनिल देशमुख येणार असल्यामुळे त्यांच्या घरालाही रोषणाई करण्यात आली आहे.  

अनिल देशमुख यांचं श्रद्धा निवासस्थान हे फुलांनी सजविण्यात आलं आहे.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories