ऐश्वर्या रॉय-बच्चनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतं आहे. यात ऐश्वर्या खूपच रागात दिसून येत आहे.
ऐश्वर्याचा हा राग पाहून अभिषेक बच्चनसह आजूबाजूचे सर्वचं जण शांत झालेले दिसून येत आहेत.
ऐश्वर्या आधी अभिषेक बच्चनला काही तरी सांगतं आहे, त्यावर अभिषेक ऐश्वर्याला समजावत आहे. पण ऐश्वर्याचा राग शांत होतं नाही.
याच दरम्यान, नव्या नवेली नंदा ऐश्वर्याला काही तरी विचारते. पण ऐश्वर्या तिच्यावरही चिडते. शेजारी बसलेला सिंकदर शेखही ऐश्वर्याचा हा अवतार पाहून आवाक् झाला.
हा व्हिडीओ एका कब्बडी मॅच दरम्यानचा असल्याचं सांगण्यात येत आहे. अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पॅंथरची मॅचमध्ये बच्चन कुटुंबीय उपस्थित राहिले होते.
ऐश्वर्याचा हा राग टीमवर आणि टीमच्या कामगिरीवर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच मुद्द्यावर ती अभिषेकसोबत चर्चा करत होती.
याच दरम्यान, मुलगी आराध्याने ऐश्वर्याला लगेच मिठी मारत तिचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. तिच्या या कृतीचे कौतुक होतं आहे.
बाळाला जन्म दिल्यानंतर महिलेला बसला धक्का, रूग्णालयातून शेअर केला व्हिडीओ, नेमकं काय घडलं?