Photo Credit; instagram

Arrow

अजित पवार विरुद्ध शरद पवार वाद पेटला! रोहित पवारांची सडकून टीका

Photo Credit; instagram

Arrow

महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यत्र शरद पवार यांचा नातू रोहित पवार यांनी आजोबांच्या पाठिशी असल्याचं सांगितलं.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान त्यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. जी चर्चेचा विषय ठरतेय.

Photo Credit; instagram

Arrow

रोहित पवारांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे, 'आज या दारात… उद्या त्या दारात पण, एक दिवस लोकांकडं जावंच लागेल

Photo Credit; instagram

Arrow

'तोंड कसं दाखवणार? काल तर कडवा विरोध होता. मग आज अचानक गळ्यात गळा कसा? तो कोणता गळ आहे… ज्या गळाला लागला मासा!'

Photo Credit; instagram

Arrow

'तुमच्या या चिखलात आम्ही का चालायचं? रोजचीच चिखलफेक बघत का बसायचं? अरे कुठं गेली तत्व अन् कुठे गेला विचार? किती दिवस आम्ही हेच ऐकायचं?'

Photo Credit; instagram

Arrow

'जगण्याची, विचारांची बदलत चाललीय भाषा.. आता कुणाकडून करायची जनतेने आशा? भरवशाच्या म्हशीलाच झालाय टोणगा.. कोणता पक्ष... कोणता विचार.. अन् कसली निष्ठा..'

Photo Credit; instagram

Arrow

'साहेब, लोकहिताचं शस्त्र तर आहेच तुमच्या हाती आता तुम्हीच उठा,अन् मैदानात उतरा… शेकडो, हजारो,लाखो, करोडो हात देतील तुम्हाला साथ.. त्यात माझेही असतील दोन हात.'

Photo Credit; instagram

Arrow

रोहित पवारांची, शरद पवारांचं समर्थन करणारी ही पोस्ट व्हायरल झाली आहे. तर, त्यांनी राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांना यातून चांगलंच सुनावलं आहे.

Twitter VS Threads : ट्विटरला टक्कर देणारं मेटाचं थ्रेड्स आहे तरी काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा