Photo Credit; instagram

Arrow

अनुराग कश्यपला करायचं नाही शाहरुख-सलमानसोबत काम; कारण..

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने आपला चित्रपट हिट होणार की फ्लॉप याचा विचार कधीच केला नव्हता. तसंच कधीच बॉक्स ऑफिसची चिंता केली नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

पण त्याने कोणत्या मोठ्या सुपरस्टारसोबत कधी चित्रपटही केला नाही. नुकतंच एका मुलाखतीत अनुरागने यामागचं कारण सांगितलं. 

Photo Credit; instagram

Arrow

अनुराग म्हणाला, 'मला शाहरुख खान आणि सलमान खानसोबत कधीच काम करायचे नाही, याचे कारण म्हणजे त्यांचा चाहता वर्ग.' 

Photo Credit; instagram

Arrow

"दोघंही खूप मोठे स्टार आहेत. चित्रपट बनवण्याच्या उद्देशाने मी या इंडस्ट्रीत आलो असलो तरी, मी कधीही मोठ्या स्टार्सशी संपर्क साधला नाही."

Photo Credit; instagram

Arrow

"प्रत्येकजण येऊन मला विचारायचा की तू मोठ्या स्टारसोबत चित्रपट का बनवत नाहीस. पण मी लक्ष दिलं नाही कारण मला मोठ्या स्टारसोबत चित्रपट बनवायचा नव्हता."

Photo Credit; instagram

Arrow

"मोठ्या स्टार्सचा चाहतावर्ग वेगळा असतो. काहीही झालं तर ते थेट तुम्हालाच कॅन्सल करतात. माझे तर किती सिनेमे रद्द झालेत कारण ते प्रेक्षकांना आवडले नाहीत."

Photo Credit; instagram

Arrow

"मी नेहमीच माझ्या आवडीचे चित्रपट बनवले. मी फॅनबॅसचा विचारही केला नाही किंवा कोणाला प्रभावित करण्यासाठी इथे आलो नाही. मी चित्रपट बनवण्यासाठी आलो आहे, मी तेच करणार."

Photo Credit; instagram

Arrow

"चाहत्यांचं कसं आहे, एखादा चित्रपट चांगला नसेल तर ते तुम्हाला टार्गेट करतील."

Photo Credit; instagram

Arrow

"यासोबतच, मला शाहरुख किंवा सलमानसोबत काम करायचे नाही कारण त्यांच्यामुळे इतर स्टार्सची दखल घेतली जात नाही. त्यांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळत नाही."

Yo-Yo टेस्टमध्ये 'या' खेळाडूने कोहली-रोहितलाही पछाडलं, तरीही का मिळणार शिक्षा?

पुढील वेब स्टोरी