Photo Credit instagram

Arrow

अशोक चव्हाण, जयंत पाटलांना 2019 मध्ये बसला होता धक्का, कारण...

Arrow

महाराष्ट्राची झोप उडवणाऱ्या पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा 'मुंबई Tak बैठक' मध्ये पुन्हा एकदा चर्चेत आला.

Arrow

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी प्रमुख उपस्थिती दर्शवली.

Arrow

त्यांनी यावेळी 2019 मध्ये त्यांच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला. ज्यामुळे त्यांना धक्का बसला होता.

Arrow

'सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात काही बदल झाले तर, भाजपचा प्लान बी तयार आहे, अशी चर्चा महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे.'

Arrow

'तुम्ही दोघंही आपापल्या पक्षाचं नेतृत्व करताना याबद्दल काही ग्वाही देऊ शकता का की, तुमच्या पक्षातून कुणीही जाणार नाही?' असा प्रश्न अशोक चव्हाण आणि जयंत पाटलांना विचारण्यात आला.

Arrow

या प्रश्नावर उत्तर देत अशोक चव्हाण म्हणाले, गृहितकांवरील प्रश्नांवर बोलण्यात काही अर्थ नाही. वास्तव काय हे पाहियला हवं. याआधी आम्हालाही धक्का बसला होता.

Arrow

'अचानक शपथविधी सुरू झाला, तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटलं. त्यादिवशी मी मुंबईत होतो आणि जयंतरावांना मी फोन केला.'

Arrow

अशोक चव्हाण म्हणाले, 'अहो म्हटलं हे काय चाललंय. शपथविधी आपल्या पक्षाचा चालला की कुणाचा?'

Arrow

'जयंतराव म्हणाले आपला नाही, त्यांचा सुरू आहे. त्यामुळे असे प्रसंग आम्ही पाहिलेले आहे.' असा अशोक चव्हाणांनी त्यांच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला.

अशोक चव्हाण, जयंत पाटलांना 2019 मध्ये बसला होता धक्का, कारण.....

पुढील वेब स्टोरी