अयोध्या खंडपीठात न्यायमूर्ती रंजन गोगोई, शरद बोबडे, डीवाय चंद्रचूड, अशोक भूषण आणि अब्दुल नझीर यांचा समावेश होता.
न्यायमूर्ती रंजन गोगोई 17 नोव्हेंबर 2019 ला सरन्यायाधीश म्हणून निवृत्त झाले. ४ महिन्यांनंतर राष्ट्रपतींनी त्यांना राज्यसभेचे सदस्य म्हणून नामनिर्देशित केले
न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे 23 एप्रिल 2021 रोजी CJI पदावरून निवृत्त झाले. ते सध्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरचे कुलपती आहेत.
न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड हे भारताचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत. त्यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
न्यायमूर्ती अशोक भूषण जुलै 2021 रोजी निवृत्त झाले. चार महिन्यांनंतर त्यांना राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण (NCLAT) चे अध्यक्ष बनवण्यात आले.
न्यायमूर्ती अब्दुल नझीर जानेवारी 2023 मध्ये निवृत्त झाले. एका महिन्यानंतर त्यांना आंध्र प्रदेशचे राज्यपाल बनवण्यात आले.