BEST Ac double decker: बेस्टची 'लालपरी'! मुंबईत धावणार ही एसी डबल डेकर
भारतातील पहिली एसी डबल डेकर बस आजपासून (13 जानेवारी) मुंबईच्या रस्त्यांवरून धावणार आहे.
ही आकर्षक आणि आरामदायक एसी डबल डेकर बस पुढच्या आठवड्यापासून प्रवाशांसाठी उपलब्ध होईल.
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सपालसून (BKC) ते वांद्रे स्थानकापर्यंत ही बस असेल. नंतर, दक्षिण मुंबईतील इतर मार्गांवर सेवा सुरू होईल.
CSMT वरून नरीमन पॉइंट, कुलाबावरून वरळी आणि कुर्लावरून सांताक्रूझ असे या एसी बसचे मार्ग असणार आहे.
बेस्टच्या ताफ्यात सध्या 45 डबल डेकर बसेस आहेत. त्या जुन्या झाल्याने एसी डबल डेकर बस विकत घेण्याचा निर्णय घेतला.
बेस्टने सुरू केलेल्या नवीन डबल डेकर बसेसची प्रवासी क्षमता 76 आहे.
डबल डेकर बसेस मुंबईकरांसाठी एक विशेष प्रकारचं आकर्षण आहेत.
डबल डेकर एसी बसेसची किंमतही सामान्यांना परवडेल अशी 6 रूपये असणार आहे.
सुरक्षेसाठी या एसी डबल डेकर बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरीही आहेत. तसंच, 100 प्रवासी यातून प्रवास करू शकतात.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
आणखी वेबस्टोरीज वाचा