Bipasha Basu च्या तीन महिन्याच्या लेकीवर मोठी शस्त्रक्रिया, अभिनेत्रीने सांगितलं काय झालं?
Photo Credit; instagram
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या मुलीचा जन्म 12 नोव्हेंबर 2022 रोजी झाला.
Photo Credit; instagram
याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याची माहिती सगळ्यांनाच दिली होती.
Photo Credit; instagram
आता 8-9 महिन्यांनंतर बिपाशानं तिच्या लेकीच्या आरोग्याविषयी एक अपडेट शेअर केली आहे.
Photo Credit; instagram
बिपाशा म्हणाली, 'जेव्हा देवीचा जन्म झाला तेव्हा ती वेंट्रिकुलर सेप्टल डिफेक्ट या आजाराने त्रस्त असल्याचे कळले.'
Photo Credit; instagram
अभिनेत्री नेहा धुपियासोबत असलेल्या इंस्टाग्राम लाइव्हमध्ये बिपाशानं हे सांगितलं. तिच्या मुलीच्या हृदयात दोन छिद्रे आहेत.
Photo Credit; instagram
'देवी तीन महिन्यांची असताना तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. कोणत्याही नॉर्मल आई-वडिलांपेक्षा आमचा प्रवास खूप वेगळा होता.'
Photo Credit; instagram
'आमच्यासाठी तो काळ खूप कठीण होता. मी हे सांगणार नव्हते. पण मला असं वाटतं की अशा अनेक आई आहेत, ज्यांनी यात माझी मदत केली आणि त्या आईंना शोधणं खूप महत्त्वाचं आहे.'
Photo Credit; instagram
बिपाशा तिच्या मुलीच्या ऑपरेशनविषयी बोलताना म्हणाली की देवी तीन महिन्याची असताना तिची सर्जरी झाली आणि ऑपरेशन सहा तास सुरु होतं.
Photo Credit; instagram
'ती जितका वेळ आत होती तितका वेळ आमचं जग जसं थांबलं होतं. खूप चिंता वाटतं होती पण सर्जरी यशस्वी झाली. देवी आता ठीक आहे.'