Photo Credit INSTAGRAM

Arrow

सलमानसोबत काम करणाऱ्या ग्लॅमरस अभिनेत्रीला रिजेक्ट क्वीनचा टॅग; बनली साध्वी! नेमकं काय घडलं?

Arrow

90 च्या दशकातील अशा अनेक बॉलिवूड अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या सौंदर्याने चाहत्यांना प्रेमात पाडले.

Arrow

अभिनेत्री ममता कुलकर्णी ही यापैकी एक आहे. तिचे नाव घेताच एक सुंदर आणि मोहक चेहरा डोळ्यांसमोर येतो.

Arrow

90च्या दशकात बाजी, नसीब, करण अर्जुन आणि आशिक आवारा अशा अनेक चित्रपटांमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली.

Arrow

करण अर्जुन चित्रपटातील 'मुझको राणाजी माफ करना' ममताच्या या गाण्याने कहरच केला. सर्वत्र तिच्या सौंदर्याची चर्चा होऊ लागली.

Arrow

यानंतर तिने 90च्या दशकात एका मासिकासाठी टॉपलेस फोटोशूट केले. ज्यामुळे ती वादात सापडली होती.

Arrow

ममता कुलकर्णीला त्याकाळात वेगळीच डिमांड होती. त्यामुळे प्रत्येक दिग्दर्शकाला तिच्यासोबत काम करायचे होते.

Arrow

पण ममता त्यावेळी सतत चित्रपट नाकारत होती तर, फक्त काही प्रोजेक्ट्स साइन करत होती. यामुळे तिला बॉलिवूडची रिजेक्शन क्वीन असे नाव पडले.

Arrow

ममताने 1992 मध्ये 'तिरंगा' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. 2002 मध्ये प्रदर्शित झालेला 'कभी तुम कभी हम' हा तिचा शेवटचा चित्रपट होता.

Arrow

एकेकाळी ग्लॅमर दुनियेचा भाग असलेल्या ममता आता अध्यात्माच्या मार्गावर जाताना दिसत आहे. 2013 मध्ये तिने 'ऑटोबायोग्राफी ऑफ अॅन योगिनी' या पुस्तकाचे प्रकाशन केले.

Arrow

या पुस्तकात तिने चित्रपट विश्वापासून अंतर ठेवण्याचे कारण सांगितले.

Arrow

'काही लोकांचा जन्म जगाच्या कामासाठी होतो, तर काहींचा जन्म देवासाठी होतो. माझा जन्मही देवासाठी झाला आहे.' असे ममता म्हणाली आहे.

Hemangi Kavi : 'मी आई-बाबांची प्रायव्हसी...', मराठमोळ्या अभिनेत्रीचे बोल्ड विधान

पुढील वेब स्टोरी