Bollywood : 'या'चित्रपटांविरोधात देशात झाला गदारोळ, तुम्हाला किती माहितीये?
Photo Credit; instagram
गेल्या आठवड्यात आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बरीच चर्चा रंगली आहे. प्रेक्षक निराश झाले आहेत.
Photo Credit; instagram
आदिपुरूषमधील पात्रांमुळे वाद निर्माण झाला आहे. तसंच, व्हीएफएक्स अभिनय आणि वेशभूषेवर जोरदार टीका होत आहे.
Photo Credit; instagram
अशा स्थितीत निर्मात्यांनी यातील डायलॉग्स बदलण्याबाबत माहिती दिली आहे. याआधीही अनेक चित्रपटांवरून धार्मिक वाद झाले आहेत.
Photo Credit; instagram
धर्मांतराचा मुद्दा उपस्थित करत 'द केरला स्टोरी' चित्रपटावर मुस्लिम धर्माची गडद आणि नकारात्मक छटा दाखवल्याचा आरोप करण्यात आला होता.
Photo Credit; instagram
विवेक अग्निहोत्रींचा 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट प्रदर्शित होताच त्यावर अपप्रचार आणि दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला होता.
Photo Credit; instagram
निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्या काली या चित्रपटाच्या पोस्टरवरून बराच वाद झाला होता. पोस्टरमध्ये माँ काली सिगारेट ओढताना दाखवण्यात आली होती, तर LGBTQ चा झेंडाही दिसला.
Photo Credit; instagram
सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाच्या निमित्ताने राजपूत आणि गुर्जर समाज आमनेसामने होते. करणी सेनेच्या दबावानंतर निर्मात्यांना चित्रपटाच्या शीर्षकात सम्राटचा समावेश करावा लागला.
Photo Credit; instagram
ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या अक्षयच्या 'लक्ष्मी' या चित्रपटाच्या नावावरून मोठा वाद झाला होता. ते पूर्वी लक्ष्मी बॉम्ब होते, ते बदलून लक्ष्मी असे करण्यात आले.
नितीन गडकरींचा 'या' नेत्यासोबत रेल्वेनं प्रवास! पाहा video