राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा राष्ट्रवादीत गोंधळ उडाला आहे.
Photo Credit; instagram
शरद पवारांच्या या निर्णयाला कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला आहे. तसेच, त्यांचा राजीनामा नामंजूरही केला आहे.
Photo Credit; instagram
समितीतील महत्त्वाचे नेते हे सिल्व्हर ओक म्हणजेच शरद पवारांच्या निवासस्थानी हा प्रस्ताव घेऊन गेले होते.
Photo Credit; instagram
आता शरद पवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ही अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे.
Photo Credit; instagram
याचबाबत बोलताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी माहिती दिली आहे.
Photo Credit; instagram
प्रफुल पटेल म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची जी बैठक झाली त्यात आम्ही सर्वानुमते निर्णय घेतला की शरद पवार यांनीच अध्यक्षपदी कायम राहावे.'
Photo Credit; instagram
तर शरद पवार यावर म्हणाले की, 'मी याविषयी थोडा विचार करतो आणि तुम्हाला याबाबत नेमकं काय ते कळवतो.’