Sidharth-Kiara: लग्नानंतर मुंबईत ग्रँड रिसेप्शन;  पाहा  Exclusive Photo

बॉलिवूडचं क्यूट कपल सध्या त्यांच्या लग्नामुळे बरंच चर्चेत आहे.

Sidharth-Kiaraचं लग्न 7 फेब्रुवारीला राजस्थानच्या जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये थाटामाटात पार पडलं होतं.

लग्नानंतर मुंबईत, सिद्धार्थ-कियाराने ग्रँड रिसेप्शनचं आयोजन केलं होतं.

ग्रँड रिसेप्शनला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. याचे काही फोटोही समोर आले आहेत.

मुंबईतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाचं हे ग्रँड रिसेप्शन होतं.

रिसेप्शनसाठी सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीचा खूपच सुंदर लूक पाहायला मिळाला.

दोघांनीही ब्लॅक अँड व्हाइट आउटफिट परिधान करून ट्विनींग केलं होतं.

कियाराने ब्लॅक अँड व्हाइट रंगाच्या सिल्क ड्रेसवर आकर्षक हिरवा डायमंड नेकलेस परिधान केला होता.ज्यामुळे ती खूपच आकर्षक दिसत होती.

तसंच, सिद्धार्थ मल्होत्राने ​​काळ्या रंगाचा सूट घातला होता, ज्यामध्ये तो अतिशय हँडसम आणि हॉट दिसत होता.

मुंबईतील या ग्रँड रिसेप्शनला फिल्म इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या स्टार्सनी हजेरी लावली.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories