ही गोष्ट एका अशा हॉटेलची आहे, ज्याची सुरुवात १९२६ साली आहे. याला बनविण्याचा खर्च त्यावेळी 9 कोटी आला होता.
हॉटेलची ओपनिंग १९२९ साली झाली होती. या हॉटेलच्या १४ व्या मजल्यावर ४५० खोल्या आहेत. यात एक पूल आणि स्पा देखील आहे. पण या हॉटेलच्या जवळून जायलाही लोकं घाबरतात.
असं मानलं जातं की, या हॉटेलमध्ये जादुचे पाणी पिऊन एक मानसिकरित्या आजारी महिला पूर्ण ठीक झाली होती. या पाण्याला रिच वॉटरही म्हटलं जातं.
याचं नाव बेकर्स हॉटेल आहे, अमेरिकेच्या टेक्सासमध्ये हे हॉटेल आहे. महिलेची तब्येत ठीक झाल्यानंतर हे हॉटेल खूपच चर्चेत आले.
१९३१ मध्ये स्टॉक मार्केट क्रॅश झाल्यामुळे हॉटेल चालविणं अवघडं झालं होतं. त्यामुळे त्याचे मालक बदलण्यात आले.
अशातच दुसरे महायुद्ध सुरु झाले आणि हॉटेल बंद करण्यात आले. पण आजारी लोकं ते जादुचे पाणी पिण्यासाठी येत होते.
अशा अफवा आहेत की, इथे पाणी तर मिळत नाही. पण हॉटेलमध्ये येणार लोकं पाण्याच्या शोधात इलाज न झाल्याने इथेच अखेरचा श्वास घेतात.
त्यामुळे याच लोकांच्या आत्मा इथे भटकत राहतात. मिरर युकेच्या रिपोर्टनुसार इथे येणारे लोकं खरचटल्यापासून ते मोठ्या जखमेपर्यंतच्या तक्रारी घेऊन येतात.
सोशल मिडियावर लोकांनी हॉटेलचे जुने फोटो शेअर केले आहेत. दिसताना हॉटेल खूपच भीतीदायक वाटतं आहे.
Taj Mahal: कसा बनला होता ताजमहाल? AI ने रेखाटलेले फोटो पाहाच