Photo Credit; instagram

Arrow

शरीरातील हिमोग्लोबिन कमी झालं? करा 'हे' घरगुती उपाय...

Photo Credit; instagram

Arrow

आजकाल बहुतेक लोकांच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता दिसून येते. हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये असलेले लोहयुक्त प्रथिन आहे आणि ते शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते.

Photo Credit; instagram

Arrow

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, श्वास घेण्यात अडचण इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी हिमोग्लोबिनची कमतरता दूर होण्यासाठी काय करावं? जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

शरीराला लोह शोषण्यासाठी एका माध्यमाची आवश्यकता असते आणि व्हिटॅमिन सी हे ते माध्यम म्हणून काम करते. यासाटी लिंबू, संत्री, टोमॅटो, बेरीचे सेवन करा.

Photo Credit; instagram

Arrow

लोहाच्या कमतरतेमुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊ लागते. यासाठी हिरव्या पालेभाज्या, टोफू, पालक, अंडी, धान्य इत्यादींचे सेवन करा.

Photo Credit; instagram

Arrow

फॉलिक अॅसिडच्या कमतरतेमुळे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता होते. यासाठी हिरव्या पालेभाज्या, स्प्राउट्स, केळी, ब्रोकोली इत्यादींचा आहारात समावेश करा.

Photo Credit; instagram

Arrow

डाळिंब हे प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर तसेच कॅल्शियम आणि लोहाचा चांगला स्रोत आहे. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे फायदेशीर मानले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

बीटरूट हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्याचा एक उत्तम उपाय आहे. यात लोहाचे प्रमाण जास्त असते. 

Photo Credit; instagram

Arrow

भोपळ्याच्या बियांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज असते. शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी याचे सेवन फायदेशीर ठरते.

अप्सराच! जान्हवी कपूरचं निखळ आरस्पानी सौंदर्य

पुढील वेब स्टोरी