Arrow

महिना 30 हजार पगारातही करोडपती व्हाल, जाणून घ्या फॉर्म्युला

Arrow

करोडपती होण्याचे स्वप्न प्रत्येकजण पाहतो. पण कसे बनता येईल याच्या शर्यतीत सर्व धावतायत.

Arrow

महागाईच्या काळात बचत करणे खुपच अवघड झाले . पण काही असे फॉर्म्युले असतात, जे तुम्हाला करोडपती बनवू शकतात.  

Arrow

हा फॉर्म्युला 50:30:20 असा आहे. तर हा फॉर्म्युला तुमचा पगार तीन भागात विभागल्यानंतर काम करतो.

Arrow

तुम्ही फक्त 30,000 रुपये मासिक पगारावर नोकरी करत असतानाही पुढील 20 वर्षात करोडपती होऊ शकता.

Arrow

जर फॉर्म्युला पाहिला तर 30,000 रुपये पगार 15000 + 9000 + 6000 रुपयांच्या तीन भागांमध्ये विभागला गेला पाहिजे.

Arrow

पहिला भाग तुमचा अत्यावश्यक खर्च, लाईफस्टाईल, जेवण, शिक्षण किंवा इतरांवर खर्च करावा. या खर्चाची यादी तयार करा.

Arrow

यानंतर, तुम्ही 9,000 रुपयांचा दुसरा भाग हँग आउट, चित्रपट पाहणे, बाहेर खाणे, गॅजेट्स आणि इतर छंद पूर्ण करण्यासाठी वापरू शकता.

Arrow

तिसरा भाग म्हणजे 6000 रुपये तुम्हाला करोडपती बनवण्यासाठी उपयुक्त ठरतो. हा पैसा योग्य ठिकाणी गुंतवावा लागेल.

Arrow

हे पैसे तुम्ही दर महिन्याला SIP मध्ये म्युच्युअल फंडात गुंतवू शकता. अशा प्रकारे तुम्ही वार्षिक 72000 रुपये गुंतवाल.

Arrow

कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही दरमहा 6,000 रुपये गुंतवले, आणि तुमचे उत्पन्न वाढेल तसे गुंतवणुकीत दरवर्षी 20% वाढ केली.

Arrow

 20 वर्षांनंतर, तुम्हाला त्या गुंतवणुकीवर वार्षिक 12% व्याजाने एकूण 2,17,45,302 रुपये मिळतील.

Arrow

15% दराने व्याज मिळाल्यास एकूण 3,42,68,292 रुपये मिळतील. म्हणजे या फॉर्म्युल्याने करोडपती होणे अवघड नाही.

मिस युनिवर्सने ट्रान्स्फॉरमेशन करून फॅन्सना दिला धक्का

पुढील वेब स्टोरी