bhimashankar : देशात बारा ज्योतिर्लिंग, महाराष्ट्रात किती? जाणून घ्या

देशात अनेक प्राचीन मंदिरं आहेत. प्रत्येक मंदिरांच्या वेगवेगळ्या कथा आहेत.

धार्मिक स्थळांमध्ये महादेवाची 12 प्रसिद्ध ज्योतिर्लिंगंही आहेत.

12 प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये उत्साह असतो. याच ज्योतिर्लिंगांबद्दल जाणून घेऊयात.

महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे.

सह्याद्री पर्वतावर वसलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगामधून प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते.

औरंगाबाद जिल्ह्यातील संभाजीनगर जवळ दौलताबाद येथे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे.

बीड जिल्ह्यात परळी येथे वैजनाथ ज्योतिर्लिंग आहे. हे श्रद्धास्थान जागृत समजलं जातं.

नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे.

त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वत आहे जिथून गोदावरी नदी सुरू होते.

महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ हे प्राचीन कालीन ज्योतिर्लिंग आहे. नागेश्वर मंदिरासाठी औंढा हे गाव प्रसिद्ध आहे

Visit: www.mumbaitak.in/

For more stories