syria Earthquake : कुटुंबातील 25 जणांचा मृतदेह पाहून व्यक्तीचा टाहो... भूकंपात घर उद्ध्वस्त

सीरिया-तुर्कीमध्ये घडलेल्या थरारक भूकंपानंतर, सध्याची स्थिती बिकट झालीय. 

या भयानक प्रसंगामुळे सगळीकडे हाहाकार उडालाय. प्रेतांचा खच पडलाय.  जवळपास १३ हजार जणांना आपला जीव गमवावा लागाल आहे.

अशा परिस्थितीत, हृदय पिळवटून टाकणारे दृश्य सीरियातील साराकिब शहरातून समोर आले आहेत.

सीरियात राहणारा अहमद इद्रीस सुरू असलेल्या युद्धामुळे साराकिबमध्ये पोहोचला. 

मुलांना आणि स्वतःला सुरक्षित निवारा मिळेल या आशेवर तो साराकिबमध्ये आला होता. पण, आज त्याच्यावर काळाचा आघात झालाय.

सीरियातील भूकंपात इद्रिसच्या कुटुंबातील 25 जणांचा मृत्यू झाला.

शेल्टर होममधील एका खोलीत, 25 मृतदेह ठेवण्यात आले त्यावेळी तिथे जीवंत इद्रिसही होता. 

हे पाहून इद्रिसने टाहो फोडला. तो प्रेतांकडे जात मिठी मारत होता. अश्रूंच्या धारा अनावर झाल्या. 

इद्रिसला आयुष्यभरासाठी हे दु:ख मिळाले. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories