सजलेला मंडप, बोहल्यावर नवरी.. पण लग्न लागलं दिरासोबत!

उत्तरप्रदेशमधील एका लग्नात एक विचित्र घटना घडली. ऐन लग्नाआधी नवरदेवच गायब झाला.

फेशियल करायला जाण्याच्या बहाण्याने नवरदेव अचानक गायब झाला.

नवरदेवाबाबत काहीच माहिती हाती न लागल्यामुळे हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं.

बेपत्ता नवरदेवाचा शोध पोलिसांनी सुरू केला. त्याचवेळी नवरदेवाच्या छोट्या भावाचं म्हणजेच दिरासोबत मुलीचं लग्न लावून दिलं.

पोलिसांना बेपत्ता नवरदेवाच्या मोबाइल क्रमांकाच्या सीडीआरमधून एका मुलीचा नंबर मिळाला. नंतर, हे प्रकरण उघडकीस आलं.

बेपत्ता नवरदेव, प्रेयसीसोबत कोर्ट मॅरेज करून दहा दिवसांनी परतला. 

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करताच त्यांनी कोर्ट मॅरेज केलं असल्याचं सांगितलं आणि कागदपत्र दाखवली.

वडील यावेळी म्हणाले, 'आमचा छोटा मुलगा आमच्या घराची शान आहे. त्याने आमची इज्जत ठेवली.'

Visit: www.mumbaitak.in/

For more stories