Photo Credit; instagram

Arrow

6,6,6,6.. सूर्याने रचला इतिहास, कोहलीचाही मोडला 'तो' विक्रम!

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी (२४ सप्टेंबर) इंदूरमध्ये खेळला गेला.

Photo Credit; instagram

Arrow

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 5 विकेट गमावत 399 धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांनी शतके झळकावली.

Photo Credit; instagram

Arrow

पण यादरम्यान, टी-२० चा नंबर-1 फलंदाज सूर्यकुमार यादवच्या शॉटने सर्वांनाच चकित केलं. त्याने झटपट अर्धशतक ठोकले.

Photo Credit; instagram

Arrow

सूर्यकुमारने 37 चेंडूत 72 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्याने 6 षटकार आणि तेवढेच चौकार मारले.

Photo Credit; instagram

Arrow

सूर्याने 24 चेंडूत अर्धशतक केले होते. अशाप्रकारे, तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात जलद वनडे अर्धशतक झळकावणारा भारतीय ठरला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सूर्यापूर्वी विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २७ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. आता हा विक्रम मोडीत निघाला.

Photo Credit; instagram

Arrow

सूर्याने डावाच्या 44व्या षटकात कॅमेरॉन ग्रीनच्या चेंडूवर सलग 4 षटकारही ठोकले. या षटकात एकूण 26 धावा केल्या.

Premanand Maharaj : 'या' 2 गोष्टी करा... विघ्न जातील अन् येतील चांगले दिवस!

पुढील वेब स्टोरी