भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला.
Photo Credit; instagram
या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला भारतीय संघाच्या प्लेइंग-11 मध्ये स्थान देण्यात आले नव्हते.
Photo Credit; instagram
जसप्रीत बुमराहने कौटुंबिक कारणांमुळे ब्रेक घेतला आहे. बीसीसीआयने यासंदर्भातील माहिती दिली.
Photo Credit; instagram
बीसीसीआयने ट्वीटरवर लिहिलं की, 'जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी टीमसोबत इंदूरला गेला नाही.'
Photo Credit; instagram
'तो त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेला असून संघ व्यवस्थापनाने त्याला एक छोटा ब्रेक दिला आहे.'
Photo Credit; instagram
ट्विटमध्ये पुढे म्हटलं की, 'दुसऱ्या वनडेसाठी बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाज मुकेश कुमारचा संघात समावेश करण्यात आला आहे. बुमराह राजकोट येथे होणाऱ्या शेवटच्या वनडेसाठी संघात सामील होणार आहे.'
Photo Credit; instagram
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह नुकताच वडील झाला. बुमराहची पत्नी संजना गणेशन हिने मुलाला जन्म दिला.
Photo Credit; instagram
बुमराहने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. बुमराहने आपल्या मुलाचे नाव अंगद ठेवले आहे.
Photo Credit; instagram
बुमराहने आशिया चषक सोडला आणि नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी भारतात परतला. नेपाळविरुद्धच्या सामन्यात बुमराहने भाग घेतला नव्हता.
Katrina Kaif प्रेग्नेंट? सगळीकडे विकी एकटाच का फिरतो?