Delhi Mumbai Expressway: भारतातील सर्वात लांब Expressway चे Exclusive फोटो
भारतातील सर्वात लांब द्रुतगती मार्गाची पहिली झलक समोर आलीए. 1 हजार 386 किमी लांबीचा हा सर्वात लांब एक्स्प्रेसवे आहे.
दिल्ली-मुंबईला जोडण्यासाठी या द्रुतगती महामार्गाच्या बांधकामाला प्रोत्साहन देण्यात आलं.
हा एक्स्प्रेसवे दिल्लीसह हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातून जाणार आहे.
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे जयपूर, अजमेर, कोटासारख्या अनेक मोठ्या शहरांच्या आर्थिक केंद्रांशी कनेक्टिव्हिटी सुधारेल.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखालील एक्स्प्रेसवेचं काम जोरात सुरू आहे.
भारत सरकार सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या एक्स्प्रेसवेचं बांधकाम करत आहे. अशी माहिती नितीन गडकरींनी दिली.
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेचं बांधकाम 2023 च्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे.
पूर्वी दिल्ली ते मुंबई यादरम्यानचा प्रवास 24 तास एवढा होता, आता या एक्स्प्रेसवेमुळे हा प्रवास 12 तासांचा होणार आहे.
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेचा विकास हा जर्मन तंत्रज्ञानाने केला जात आहे. या तंत्रज्ञानामुळे एक्स्प्रेसवेचे 50 वर्ष कोणतेही नुकसान होणार नाही.
प्रवाशांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने दर 500 मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात येणार आहे.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
आणखी वेबस्टोरीज वाचा
Related Stories
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!
अभिनेत्रीने दिल्या ट्रॅफिक पोलिसाला शिव्या, भर रस्त्यात फाडले कपडे अन्...
'12th फेल' कपल लव्हस्टोरी; गर्लफ्रेंडने दिलं चॅलेंज अन् बनले IPS अधिकारी!