Photo Credit instagram

Arrow

IPL 2023: ज्यांना करोडो रुपयात घेतलं, त्यांच्याकडून अपेक्षाभंग, कोण आहेत ते खेळाडू?

Arrow

भारतात इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) चा उत्साह काही वेगळाच आहे. आतापर्यंत एकूण 12 सामने खेळले गेले आहेत.

Arrow

या सामन्यांमधील बहुतांश सामने एकतर्फी झाले आहेत. तर, काही सामन्यांमध्ये दोन संघातील रंजक संघर्ष पाहायला मिळाला.

Arrow

पण, अशा स्थितीत IPL 2023 लिलावात करोडोंमध्ये विकले गेलेल्या खेळाडूंच्या डोक्यावर टांगती तलवार दिसत आहे. 

Arrow

काही खेळाडूंचा महागड्या किंमतीत लिलाव होऊनही ते आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे खेळले नाहीत. अशा पाच खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.

Arrow

सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने IPL 2023 च्या लिलावात इंग्लिश क्रिकेटर हॅरी ब्रूकवर 13.25 कोटी रुपये खर्च केले.

Arrow

आतापर्यंत ब्रूकने RR विरुद्ध १३ आणि LSG विरुद्ध तीन धावा केल्या. दोन्ही सामन्यात फिरकी गोलंदाजाने त्याला बाद केलं.

Arrow

लिलावानंतर ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू कॅमरन ग्रीनकडून चांगली कामगिरी अपेक्षित होती, पण तो फ्लॉप ठरला.

Arrow

IPL 2023 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने कॅमरनला खरेदी करण्यासाठी 17.50 कोटी रुपये खर्च केले.

Arrow

बेन स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 च्या लिलावात तब्बल 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले.

Arrow

स्टोक्सने गुजरात टायटन्सविरुद्ध 7 आणि लखनऊविरुद्ध 8 धावा केल्या. दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सविरुद्धच्या एका सामन्यात खेळू शकला नाही.

Arrow

दक्षिण आफ्रिकेचा स्टार रिले रोसो देखील आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत फ्लॉप ठरला आहे. DC ने त्याला 400 कोटींना विकत घेतले. 

Arrow

LSG विरुद्धच्या सामन्यात रोसोने 30 धावा केल्या. तर, राजस्थानविरुद्ध 14 धावा केल्या.

Arrow

वेगवान गोलंदाज मुकेश कुमार पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सहभागी झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सने 5.50 कोटी रुपयांना त्यांना विकत घेतले.

Arrow

मुकेश यांनी लखनौ आणि गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात कोणतीही विकेट घेतली नाही. तर RR विरुद्ध 36 धावांत दोन बळी घेतले.

बळजरी केलं Kiss; रिअॅलिटी शोमध्ये महिलेसोबत नेमकं काय घडलं?

पुढील वेब स्टोरी