Photo Credit; instagram
Photo Credit; instagram
पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदर आणि सचिन मीना यांची प्रेमकहाणी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सीमा-सचिनची मैत्री, प्रेम आणि लग्नाचे किस्से भारतातून पाकिस्तानात पसरले आहेत.
Photo Credit; instagram
सीमा-सचिनची लव्हस्टोरी लोकांसाठी एक गूढच राहिली आहे, कारण त्या दोघांबद्दल रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत.
Photo Credit; instagram
अनेक भारतीय सीमाला पाकिस्तानला परत पाठवण्याची मागणी करत आहेत. पण पाकिस्तानचा प्रसिद्ध अभिनेता हुमायून सईद याने सीमा सचिनच्या प्रेमाला समर्थन दिले.
Photo Credit; instagram
एका मुलाखतीत हुमायून सईद म्हणाला, 'भारतात माझे असे अनेक मित्र आहेत, जे पाकिस्तानातील एका मुलीच्या प्रेमात पडले आणि नंतर लग्न केले.'
Photo Credit; instagram
'अनेक पाकिस्तानी महिलांचे भारतीय पती आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये अनेकांचे नातेवाईक आहेत. यात काही मोठी गोष्ट नाही.'
Photo Credit; instagram
अभिनेता पुढे म्हणाला की, 'सोशल मीडियाच्या जमान्यात अनेक चुकीच्या गोष्टी व्हायरल होतात, मात्र सकारात्मक गोष्टी दडपल्या जातात.'
Photo Credit; instagram
भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याबाबत हुमायूने सांगितले की, 'दोन्ही देशातील कलाकारांना एकमेकांसोबत काम करायचे आहे, पण राजकारणामुळे तसे होऊ शकले नाही. दोन्ही देशांच्या स्टार्सनी एकमेकांशी बोलणे थांबवू नये.'
Photo Credit; instagram