लेहेंगा पेटवून केला डान्स, कार्यक्रमाचे जजही झाले अवाक्
टीव्ही अभिनेत्री करुणा पांडे सध्या रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा'च्या सीझन 11 मध्ये दिसून येत आहे. मात्र आता तिच्या डान्समुळे आग लागली आहे. तिच्या दमदार डान्समुळेच शोच्या परीक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
करुणा पांडे डान्स करताना नक्कीच आग लावणार आहे मात्र ती आग स्टेजला नाही तर तिचा लेहेंगा पेटवून ती डान्स करणार आहे. त्यामुळे तिच्या डान्सची अनेकांना उत्सुकता लागली आहे. तो तिचा व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाला आहे.
करुणा पांडे आणि तिचा कोरिओग्राफर विवेक चाचेरेसोबत ती जबरदस्त डान्स करताना दिसणार आहे. दोघंही 'सिलसिला ये चाहता का' गाण्यावर एकत्र डान्स करणार आहेत.
'झलक दिखला'च्या सीझन 11 चा' जो प्रोमो आला आहे त्यामध्ये करुणा आणि विवेकच्या दमदार आणि बेधडक स्टाइलमुळे कार्यक्रमाचे जजही थक्क झाले आहेत. करुणाला पाहून फराह खान, अर्शद वारसी आणि मलायका अरोरा ही सगळी मंडळी अगदी भारावून गेली आहेत.
सध्या करुणा 'झलक दिखला जा' च्या मंचावर जबरदस्त परफॉर्मन्स देत आहे. त्यामुळे शोचे जज आणि प्रेक्षकही आता त्या दोघांचे चाहते झाले आहेत.
करुणा पांडे पुष्पा इम्पॉसिबल, देवांशी, भागे रे मन या टीव्ही मालिकेसाठी ती खास ओळखली जाते. या सगळ्या कार्यक्रमामध्ये तिने तिच्या अभिनयामुळेही सगळ्यांची वाहवा मिळवली होती.
World Cup 2023: शुभमन गिलची डेंग्यूमुळे लागलीय वाट?