Photo Credit Social media

Arrow

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; अजित पवार भाजपसोबत जाणार? स्वत: म्हणाले...

Arrow

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा गदारोळ सुरु आहे. राष्ट्रवादी नेते अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार का? या चर्चांना उधाण आले आहे.

Arrow

यादरम्यान, त्यांनी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.

Arrow

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची पुण्यात सभा झाली. यात अजित पवारांनी सहभाग घेतला नव्हता.

Arrow

यानंतर ते भाजपात प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

Arrow

पण आपण या रॅलीला का हजेरी लावली नाही, हे अजित दादांनी स्पष्ट केले. सुप्रिया सुळेंनीही अजितदादा नाराज नसल्याचे सांगितले.

Arrow

अजित पवारांनी ट्वीट करत याविषयी वक्तव्य केले आहे.

Arrow

'17 एप्रिलला माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईत आहे.'

Arrow

'18 एप्रिल रोजी विधानभवन येथील त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.'

Arrow

'यासोबतच मी 18 एप्रिलला आमदारांची बैठक बोलावल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे.

Arrow

'मी आमदार, पदाधिकाऱ्यांची कोणतीही बैठक बोलावलेली नाही.' अशी अजित पवारांनी दिली होती.

वजन कमी कर... काजोलच्या टाइट ड्रेसवर कोणी केली कमेंट?

पुढील वेब स्टोरी