इंदूरच्या मंदिरात राम नवमीलाच मृत्युचे तांडव! तो प्रसंग सांगताना माजिद फारुकींनी फोडला टाहो

Photo Credit facebook

Arrow

इंदूरमधील बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात रामनवमीनिमित्त होम हवन सुरू असताना एक भयानक दुर्घटना घडली.

Photo Credit facebook

Arrow

मंदिर परिसरातील विहिरीवरील छत कोसळले आणि त्यात अनेकजण पडले. या दुर्घटनेत आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे.

Photo Credit facebook

Arrow

इंदूरचे नागरी संरक्षण कर्मचारी काझी अब्दुल माजिद फारुकी यांनी सांगितले, 'ते सकाळी 11.30 वाजता बागेत असताना, त्यांना या घटनेची माहिती मिळाली.'

Photo Credit facebook

Arrow

याची माहिती मिळताच माजिद फारुकी आपल्या टीमसह तात्काळ पोहोचले. तिथे खूप गर्दी होती. तातडीने बचावकार्य सुरू झाले.

Photo Credit facebook

Arrow

'आम्ही लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीने त्याचा एक वर्षाचा मुलगा तिथे असल्याचे सांगितले', असं सांगताना फारूकींना अश्रू अनावर झाले.

Photo Credit facebook

Arrow

माजिद फारुकी म्हणाले, 'जेव्हा मी आत गेलो तेव्हा तिथे माझ्या कॉलनीतील अनेक ओळखीचे लोक होते. त्यांना बाहेर काढले.'

Photo Credit facebook

Arrow

आता नागरी संरक्षण दल युद्ध पातळीवर बचाव कार्य करत आहेत. या घटनेत 18 जणांना वाचवण्यात यश आले.

Photo Credit facebook

Arrow

16 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोन जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.

Photo Credit facebook

Arrow

बचावानंतर माजिद यांनी सांगितले, "आमच्या संजयभाईंनी मला उपवास सोडण्याची आठवण करून दिली, मग त्यांनीच मला उपवास सोडायला लावला."

Photo Credit facebook

Arrow

For more stories

अशाच वेबस्टोरींसाठी