Photo Credit; instagram

Arrow

Miss India 2023: नववीत नापास झाली होती 'ही' मिस इंडिया...

Photo Credit; instagram

Arrow

राजस्थानच्या कोटा येथील रहिवासी असणारी नंदिनी गुप्ता फेमिना मिस इंडियाचा ताज जिंकल्यानंतर प्रथमच मूळ गावी भांडहेडा येथे पोहोचली.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी माजी आमदार हिरालाल नागर यांनी नंदिनीला ट्रॅक्टरने गावी नेले. मिस इंडिया नंदिनीने या काळात काही अंतरापर्यंत ट्रॅक्टरही चालवला. गावात हजारो लोकांनी ढोल वाजवून तिचे स्वागत केले.

Photo Credit; instagram

Arrow

नंदिनीने सांगितले की, 'ती 9वीत गणितात नापास झाली होती. मला त्यात 70 पैकी 15 गुण मिळाले, हे पाहून मला वाईट वाटले. यानंतर शिक्षकांनी अभ्यास सुरू ठेवण्याचे सांगितले.'

Photo Credit; instagram

Arrow

नंदिनी म्हणाली, 'तुम्ही कुठून आलात याने काही फरक पडत नाही. मी हाडोतीमधून आहे, म्हणून मला हाडोती कसे बोलायचे ते चांगले माहित आहे आणि हिंदीतही बोलता येते.'

Photo Credit; instagram

Arrow

'या क्षेत्रात ठीकठाकपणे इंग्रजी येणे ही सर्वात मोठी समस्या आहे.यामुळे मी माझ्या इंग्रजीत सुधारणा केली. आता नव्या प्रवासाची सुरुवात आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

नंदिनी म्हणाली, 'प्रत्येकाच्या डोक्यावर एक ताज आहे. हे आपल्याला माहिती आहे. हा ताज आव्हाने, अपयश आणि अडचणींचा आहे. आपण त्या मुली आहोत ज्या अनेक गोष्टी करू शकतात. त्यासाठी कठोर परिश्रम करा, आव्हानांना घाबरू नका, संघर्ष करा.

Photo Credit; instagram

Arrow

कोटासारख्या शहरातून मुंबईत जाऊन तिचं आणि तिच्या कुटुंबाचं स्वप्न साकार करणं सोपं नव्हतं, असंही नंदिनी गुप्ताने सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

मिस इंडिया होण्याचा प्रवास माझ्यासाठी आव्हानापेक्षा कमी नव्हता, पण कुटुंब आणि आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे हे स्वप्न साकार झाल्याचे नंदिनी म्हणाली.

Photo Credit; instagram

Arrow

नंदिनी गुप्ता यांनी आपल्या मूळ गावी पोहोचल्यानंतर हडोती बोलीभाषेतील लोकांशी संवाद साधला. गावातील प्राचीन मंदिराला भेट देऊन देवाचे आशीर्वाद घेतले.

Palak Tiwari: श्वेता तिवारीच्या संघर्षाची कहाणी सांगत पलक झाली खूपच भावूक!

पुढील वेब स्टोरी