Billionaires List : मुकेश अंबानींची Top-10 श्रीमंतांच्या यादीत पुन्हा वापसी!

जगातील Top-10 अब्जाधीशांच्या यादीत काही दिवसांपासून चढ-उतार सुरू आहे.

विशेषत: भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी हे चर्चेचा विषय ठरतायत. 

हिंडेनबर्गच्या अहवालाचा, अदानी समूहाला मोठा फटका बसला. तर अंबानींच्या संपत्तीत घट झाल्याने ते यादीतून बाहेर पडले. 

मात्र, आता पुन्हा एकदा मुकेश अंबानींनी मोठी झेप घेत टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत प्रवेश केलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत गेल्या 24 तासांत एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली. 

अंबानींची एकूण संपत्ती 1.7 अब्ज डॉलरच्या वाढीसह, 83.1 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. 

Top-10 च्या यादीत पुन्हा वापसी करत, मुकेश अंबानी दहाव्या क्रमांकावर पोहोचले आहेत.