राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे अपघातानंतर पहिल्यांदाच परळीत आले.

यावेळी मुंडे यांच्यावर जेसीबीने पुष्पवृष्टी करण्यात आली. तसंच मोठ्ठा हारही घालून त्यांचं स्वागतं करण्यात आलं.

बीड जिल्ह्यात आल्यानंतर मुंडे यांनी श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे संत वामनभाऊ यांचे दर्शन घेतले.

यावेळी मुंडे यांनी गडाचे महंत ह.भ.प.श्री. विठ्ठल महाराजांचे आशीर्वाद घेतले.

परळीत स्व. पंडितराव मुंडे (अण्णा) यांच्या समाधी स्थळी जाऊन स्मृतींना अभिवादन केले.

घरी आल्यावर धनंजय मुंडे यांनी आईचेही आशीर्वाद घेतले.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories