अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाताय? आधी हे वाचा

अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. दर्शनाला जाण्याआधी या सूचना जाणून घ्या.
Siddhivinayak mandir Mumbai
Siddhivinayak mandir Mumbai Instagram Official

मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपतीची ख्याती सर्वत्र आहे. इथे दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.

10 जानेवारी रोजी अंगारकी चतुर्थी असल्यानं श्री सिद्धिविनायक गणपती न्यास तर्फे विशेष व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

श्रीसिध्दिविनायक संकेतस्थव व अॅपद्वारे 'श्री' च्या दर्शनाचे थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे.

पुरूष भाविकांना रचना संसद येथून, तर महिला भाविकांना सिल्व्हर अपार्टमेंट येथून प्रवेश दिला जाणार आहे.

दुरून दर्शनाची व्यवस्था आगार बाजार, एस. के. बोले मार्ग व श्रीसिध्दिविनायक सोसायटीच्या प्रवेशद्वारातून असणार आहे.

विकलांग, गरोदर महिला, वयोवृद्ध व्यक्ती यांना येथील पदपथावर उभारण्यात येणाऱ्या मंडपातून प्रवेश दिला जाणार आहे.

भाविकांच्या सोयीकरिता मोफत चप्पल स्टॅण्डची व्यवस्था मंडपातच करण्यात येणार आहे.

मंदिरातर्फे रूग्णवाहिका, पाणपोई तसेच महापालिकेतर्फे मोबाईल टॉयलेटची व्यवस्थाही असेल.

भाविकांच्या मार्गदर्शनासाठी मंदिरातर्फे विविध सूचना फलक, मार्गदर्शिका फलक लावण्यात येत आहेत.

भाविकांनी दर्शनाला येताना कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणू नये, अशी विनंती करण्यात आलेली आहे.

मंदिरात प्रवेश करताना मोबाईल फोन आणल्यास फोन बंद करावे लागणार आहेत.

रात्री ११.३० वाजता मंदिराचे रिध्दि व सिध्दि प्रवेशद्वार बंद केले जाणार आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in