पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व?
Photo Credit; instagram
हिंदू कॅलेंडरनुसार, पितृ पक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला संपतो.
Photo Credit; instagram
यावेळी पितृ पक्ष 29 सप्टेंबर म्हणजेच उद्यापासून सुरू होणार असून तो 14 ऑक्टोबर, शनिवारी, पितृ अमावस्येच्या दिवशी समाप्त होईल.
Photo Credit; instagram
हिंदू धर्मात श्राद्ध पक्षाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. पितृपक्षात पितरांचे स्मरण करण्याची आणि दान करण्याची परंपरा आहे.
Photo Credit; instagram
पितृ पक्षाचा हा कालावधी 15 दिवस पितरांना समर्पित आहे. पितृपक्षात पितरांना स्नान आणि नैवेद्य आणि श्राद्ध केले जाते.
Photo Credit; instagram
पितृ पक्षादरम्यान, पूर्वजांचे आभार मानले जातात आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला जातो. पितरांचे भक्तीभावाने श्राद्ध केल्याने त्यांचे पिंडदान व तर्पण होते.
Photo Credit; instagram
पितृ पक्षातील प्रतिपदा तिथी 29 सप्टेंबर रोजी दुपारी 3:26 वाजता सुरू होईल आणि 30 सप्टेंबर रोजी सकाळी 12:21 वाजता समाप्त होईल.
Photo Credit; instagram
पितृ पक्षाच्या १५ दिवसांमध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. यासोबतच या दिवसात नवीन कपडे खरेदी किंवा परिधान केले जात नाही.
Photo Credit; instagram
या दिवशी हात जोडून, पितरांचे ध्यान करावे आणि त्यांना आमंत्रण द्यावे.